दुष्काळग्रस्तांची थट्टा, राजन विचारेंनी गोविंदांना चिंब भिजवलं

September 6, 2015 10:12 PM0 commentsViews:

rajan vichare343406 सप्टेंबर : एकीकडे मराठवाड्यात पाण्याअभावी माणसं तरफडत असताना ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या दहीहंडीत पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झालीये. पाण्याची नासाडी करून राजन विचारे यांनी दुष्काळग्रस्तांची थट्टाच केलीये.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरूच आहे, त्यामुळे काही आयोजकांनी यंदा दहीहंडीचा उत्सव रद्द केला. पण तरीही काही हौशी आयोजकांनी दहीहंडीचा घाट घातला. पाण्याची नासाडी होऊ नये अशी सर्व स्तरातून अपेक्षा होती. पण मात्र ठाण्यातील खासदार राजन विचारे यांना महाराष्ट्रातल्या दुष्काळाचं काहीच देणघेणं नसल्याचं दिसतंय. खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत पाण्याची नासाडी करण्यात आली. गोविंदांन पाण्याने चिंब भिजवण्यात आलं. गोविंदांनीही पाण्याचा मनमुराद आनंद घेत डीजेच्या तालावर ठेका धरला. यावर राजन विचारेंची प्रतिक्रियाही अजब अशीच होती. खासदार साहेब म्हणतात, ठाणे हे तलावंचं शहर आहे. तलावांच्या शहरांमध्ये मासुंदा तलावमधून हे पाणी वापरण्यात आलं. गोविंदासाठी हे पाणी वापरण्यात आलं खरं पण हेच पाणी पुन्हा रिसायकलिंग करून तलावात सोडण्यात येईल असा दावाच विचारे यांनी केला. एवढंच नाहीतर तलावातलं पाणी कुठेही वापरलं जात नाही असा जावईशोधही विचारेंनी लावला. विशेष म्हणजे मुंबईतही पाणीकपात सुरू झालीये. फक्त हौशेपोटी पाण्याची नासाडी करून विचारे यांनी काय साधलं असा सवाल आता विचारला जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close