बोरोज धरण प्रदूषण : बैठकीत गावकर्‍यांचा गोंधळ

December 31, 2009 10:36 AM0 commentsViews: 1

31 डिसेंबर बोरोज धरण प्रदूषणासंदर्भात प्रातांधिकार्‍यांनी बोलवलेल्या बैठकीत गावकर्‍यांनी गोंधळ घातला. या बैठकीत MPCB चे अधिकारी आणि लोटे MIDC च्या अधिकार्‍यांचा समावेश होता. तसंच लोटे विभागातील संरपच आणि ग्रामस्थ यांनाही बोलावण्यात आलं होत. पाणीपुरवठा योजना, नद्या आणि खाड्याही प्रदूषित झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या बैठकीत गोंधळ घातला. सरकारी यंत्रणा दिशाभूल करत असल्याचा आरोपही या वेळी गावकर्‍यांनी केला. लोटे विभागातील 13 गावांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. या गावांना MIDC ने दत्तक घेण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

close