दुष्काळाचं संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांचं शंकराला साकडं

September 6, 2015 10:29 PM0 commentsViews:

cm on water306 सप्टेंबर : एकीकडे राज्यात गोविंदा रे गोपालाचा जयघोष होतोय, तर दुसरीकडे दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवान शंकराला साकडं घालत आहेत.

मुख्यमंत्री आज शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या तप आणि अनुष्ठानाच्या सांगता समारंभाच्या निमित्त ते लातूर जिल्ह्यातल्या वडवळ गावात आले होते.

चार दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात दुष्काळी दौर्‍यावर आल्यानंतर आज मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यात पुन्हा आले. दुष्काळावर यावेळी मुख्यमंत्री फारसे काही बोलले नाहीत.

मात्र महाराष्ट्रावर आणि विशेषतः मराठवाड्यावर जे दुष्काळाच संकट आहे या संकटावर आम्हाला बाहेर काढ असं साकडं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान शंकराला घातलंय. त्याबरोबरच लिंगायत समाजाच्या समस्यांबाबत देखील लिंगायत समाजाला आश्वासन दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close