मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

September 6, 2015 11:00 PM0 commentsViews:

cm solapur dora406 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौर्‍यादरम्यान, एक दुर्घटना होता होता टळली. भारती कोळी या महिलेनं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोरच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला.

भारती कोळी या अक्कलकोट येथे शिक्षण खात्यात काम करत होत्या. त्यांच्याकडे महादेव कोळी समाजाच्या जातीचा दाखला नसल्याने त्यांना 2009 साली सेवेतून कमी करण्यात आले होते. त्यानंतर वारंवार खेटे घालूनही त्यांना सेवेत घेण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी निराश होऊन अखेर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर येवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री गाडीतून उतरले आणि त्यांनी भारती कोळी यांचे निवेदन स्वीकारले आणि योग्य तो निर्णय घेवू असं आशासन दिले. मात्र आपल्याला सेवेत परत घेतले गेले नाही तर आपण कोठेही जाऊन आत्महत्या करणार असून याला प्रशासन आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील असा इशारा दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close