युती तुटण्याची घोषणा करण्याची हिम्मत मी दाखवली- खडसे

September 7, 2015 8:33 AM0 commentsViews:

eknath_khadse_banner
07 सप्टेंबर :  विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजपची युती तुटली. यासंबंधीचा एक खुलासा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. युती तुटली हे भाजपमधून शिवसेनेला कळवायची हिम्मत कुणीच दाखवली नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे. शेवटी आपण ठरवलं की आपणच सांगूया आणि ती हिम्मत आपणच दाखवली, असं खडसे यांनी सांगितलं आहे.

जळगावात एका एका सत्कार समारंभात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. भाजप स्वबळावर लढला तर नक्की जिंकेल, असा विश्वास नरेंद्र मोदींना दिल्यानंतर युती तोडण्याचा निर्णय झाला, असंही एकनाथ खडसे म्हणाले. आता एकनाथ खडसे यांच्या या विधानावर शिवसेनेची नेमकी काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close