शेतकर्‍याला हमीभाव मिळालाच पाहिजे- नाना पाटेकर

September 7, 2015 1:35 PM0 commentsViews:

07 सप्टेंबर : नांदेडसह हिंगोली आणि परभणी या तीन जिल्यातल्या 205 आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना सिनेअभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नांदेडमध्ये आर्थिक मदतीचं वाटप केलं. या शेतकर्‍यांशी संवाद साधताना, शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, असं आवाहनही नाना पाटेकरांनी सरकारला केलं आहे.

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी सध्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची दैना होत असून त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सोबतच आर्थिक मदतीसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे काल (रविवारी) नांदेडमध्ये आले होते.

Öêê×Öêêß×opy

यावेळी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुष्काळावर आत्महत्या हा पर्याय नाही. तुम्हा तसं करू नका. यावर एक उपाय म्हणजे प्रत्येक पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, असं झालं तर माझा शेतकरी सधन होईल, असं आवाहन नानांनी सरकारला केलं आहे. आपण इतर वस्तूंची एमआरपी मोजतो, मग शेतीमालाला हमीभाव का नको, भाजी आणि फळांचे भाव वाढल्यावरच आपण तक्रार का करतो, असा युक्तिवाद नानांनी केला. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य आणि रास्त भाव ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी शेतकरी सधन होईल असं नाना म्हणाले.

तर सध्या दुष्काळाचे संकट सर्वच शेतकर्‍यांसमोर आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर बोलणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात काम करणं अवघड आहे. पण शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेवून समाज म्हणून आपण त्यांचं काही देणं लागतो. त्यामुळे आपणच शेतकर्‍यांना आधार द्यायचं काम केलं पाहिजे. ही एक माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ आहे असं मकरंद अनासपुरे यावेळी बोलताना म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close