न्यू इयर पार्टीच्या परफॉर्मन्ससाठी सेलिब्रेटींची चलती

December 31, 2009 11:58 AM0 commentsViews: 112

31 डिसेंबर न्यू इयर पार्टीच्या फक्त 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी बिपाशा बासू जवळ जवळ 2 कोटी 47 लाख रुपये मिळणार आहेत. मिनिटांचा हिशेब केला तर बिपाशा प्रत्येक मिनिटाला 13 लाख रुपये कमवेल. सेलीना जेटलीसाठीही नव्या वर्षाची सुरुवात धडाकेबाज ठरणार आहे. मुंबईतल्या कंट्री क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी तिला 60 लाख रुपये ऑफर करण्यात आलेत. बॉलिवूडमधले अनेक स्टार्स न्यू इयर पाटर्‌यात सहभागी होणार आहेत, अर्थात त्यासाठीचे त्यांचे रेट्सही तेवढेच दमदार आहेत. कतरीना कैफ यावर्षी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये परफॉर्म करणार होती. त्यासाठी तिला तब्बल 2 कोटी रुपये मिळणार होते. मात्र कतरीना आजारी पडल्याने तिने तिचे सगळे कॉन्ट्रक्ट रद्द केले आहेत. गेल्या वर्षी कतरीनाला जे.डब्ल्यु. मॅरीयट हॉटेलने 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

close