मराठवाड्यातील काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता

September 7, 2015 4:34 PM0 commentsViews:

maharshtra_drought_help07 सप्टेंबर : राज्यावर दुष्काळाचं सावट अधिक गडद होत चाललंय. शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय बिकट झालीय. त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी समिती नेमण्यात आलीय. 15 दिवसांमध्ये ही समिती दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती मिळतेय. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यालाही त्यांनी भेट दिली. या चारही जिल्ह्यांची आणेवारी 35 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे इथल्या शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय.

 शेतकर्‍यांना काय मिळणार?

- बँकांकडून होणार्‍या कर्जवसुलीला स्थगिती
- मुलांच्या शाळेची फी माफ
- वीज बिल माफ
- सरकारकडून पाण्याच्या टँकरची सोय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close