शरद पवारांमुळेच राज्यावर दुष्काळाचं संकट -बाळासाहेब विखे-पाटील

September 7, 2015 5:15 PM0 commentsViews:

balasheb vikhe on pawar07 सप्टेंबर : तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि दहा वर्षं देशाचे कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी पाण्याचं राजकारण केल्यामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केलाय. आज शिर्डीतल्या लोणी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठवाड्यात कायम दुष्काळ कसा राहिल याचे नियोजन बारामतीकरांनी केल्याचा आरोप आज पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय. ज्यांनी आपल्या सत्तेच्या काळात आपल्या भागासाठी 12हजार कोटी रूपयांचा भिमा प्रकल्प हाती घेतला. आणि उसाला बेसुमार पाण्याचा वापर केला. तेच पैसे जर गोदावरी खोर्‍यात पाणी वळवण्यासाठी वापरले असते तर कदाचित आजचा दुष्काळ थोडा कमी झाला असता. मात्र, मराठवाडा कायम तहानलेला ठेवायचा आणि पाण्यासाठी प्रादेशिक भांडणे लावायच काम शरद पवारांनी केल्याची घणाघाती टीका बाळासाहेब विखे यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close