धरणं कोरडीठाक, फक्त 49 टक्के पाणीसाठा

September 7, 2015 6:14 PM0 commentsViews:

07 सप्टेंबर : पावसानं ओढ दिल्यानं राज्यातल्या धरणांमध्ये सध्या फक्त 49 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण 71 टक्के एवढं होतं. परतीचा मान्सूनही बरसण्याची शक्यता नसल्यानं येत्या काही महिन्यांमध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. सर्वात जास्त झळ मराठवाड्याला बसली असून पाणी नसल्यानं चारा टंचाईला सामोरे जावं लागतंय. काल जन्माष्टमी होती…दरवर्षी जन्माष्टमीला पाऊस येतो, मात्र यंदा जन्माष्टमी कोरडी राहिल्यानं गोविंदांच्याही आनंदावर विरजण पडलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close