पोलिसांसाठी निधी वापरला नाही : ‘कॅग’चे राज्य सरकारवर ताशेरे

December 31, 2009 12:00 PM0 commentsViews: 4

31 डिसेंबर पोलीस कल्याणासाठीचा 100 कोटी 27 लाखांचा निधी वापरलाच नसल्याचा आरोप 'कॅग' ने ठेवला आहे. कॅगने आपल्या अहवालात राज्यसरकारवर तोशेरे ओढले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाला दरवर्षीच्या मिळणारा निधी पोलिसांच्या कल्याणासाठी तसंच गृहनिर्माणासाठी वापरला जाईल अशी अपेक्षा असते. पण 2007-2008 या आर्थिक वर्षात महामंडळाला मिळालेल्या एकूण निधीपैकी 100 कोटी 27 लाखाचा निधी वापरण्यातच आला नसल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलंय. त्याचबरोबर आर्किटेक्ट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनाही त्यांच्या मोबदल्यापेक्षा जास्त रक्कम देण्यात आल्याचंही कॅगने म्हटलंय. तसंच पूर्ण झालेली कामं हस्तांतरित करतानाही नियंत्रणाचा अभाव असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे.

close