आदिवासी जमीन खरेदी कायद्यात बदलासाठी धनंजय मुंडेंचं पत्र, खडसेंचा गौप्यस्फोट

September 7, 2015 7:42 PM0 commentsViews:

khadse on aare 3407 सप्टेंबर : आदिवासींच्या जमिनी कुणालाही खरेदी करता येईल अशी कायद्यात दुरुस्ती करावी या संदर्भात निर्णय घ्या यासाठी विरोधीपक्ष नेता राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांनीच पत्र मला दिलंय असा गौप्यस्फोट महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.

एकाच पक्षातील दोन नेते कशा भूमिका घेतात याकडे खडसे यांनी लक्ष वेधलंय. आमच्या जमिनी विकण्याचा अधिकार हा घटनादत्त अधिकार आहे. त्याचा संकोच करण्याचा शासनाला अधिकार नाही, या मागणीसाठी आदिवासीच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्ही न्यायलयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला असतानाही आदिवासींच्या अज्ञानाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून राज्य शासनाने आदिवासींना जमिनी विकण्यास परवानगी दिली नाही.

राज्य शासन दोन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे उच्च न्यायालयाचा निर्णय काम करण्यात आला. आदिवासींना त्यांच्या जमिनी विकू द्या, अशी मागणी करणारी पत्रं आदिवासी आमदार तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी वर्षभरापूर्वी दिली होती. तरीही आम्ही परवानगी दिली नव्हती असं खडसेंनी सांगितलं.

राज्यातील आदिवासींच्या जमिनी कुणालाही खरेदी करता येणार नाही. या कायद्यात बदल करू नये अशी मागणी करत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिवासी आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावर खडसेंनी हा खुलासा केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close