नटरंगतील ‘गुणा’साठी अतुल कुलकर्णीची अफाट मेहनत

December 31, 2009 12:04 PM0 commentsViews: 2

31 डिसेंबर 'ऑरो' साकारताना अमिताभने मेकअपसाठी जी मेहनत घेतली होती, तशीच मेहनत अतुल कुलकर्णीने त्याच्या 'नटरंग' सिनेमासाठी घेतली आहे. नटरंग सिनेमातला 'गुणा' अभिनयानेच साकारायचा नव्हता तर तो भरदार शरीरयष्टीतून दाखवायचाही होता. त्यासाठीच अतुलचे भरपूर कष्ट केले. दोन महिन्यांच्या मेहनतीत अतुलने जे कमवलं ते त्याला शुटींग पुर्ण होईपर्यंत टिकवून ठेवायचं होतं. त्यासाठी त्याच्या व्यायामाच्या मशिन्स आणि एक खास फिटनेस ट्रेनर सेटवरही होता. सिनेमातल्या लुकसाठी बॉलिवूड ऍक्टर्सच जास्त मेहनत घेतात असा आजपर्यंतचा समज होता. मात्र अतुलने याला छेद दिलाय असंच म्हणावं लागेल.

close