दाऊदच्या मुसक्या आवळल्या, यूएईतील मालमत्तेवर टाच

September 8, 2015 7:53 AM0 commentsViews:

Dawood Ibrahim123

07 सप्टेंबर : युनायटेड अरब अमिरात अर्थात यूएईने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेवर टाच आणयला सुरुवात केली आहे. यूएईमधली दाऊदची संपत्ती जप्त केली जात असल्याची माहिती यूएईच्या अधिकार्‍यांनी भारताला दिली.

भारत सरकारच्या विनंतीवरून युएई सरकारने ही कारवाई सुरू केली आहे. युएईमध्ये दाऊदची तब्बल 5 हजार कोटी रूपयांची प्रापर्टी आहे. यूएई सरकारने त्यातल्या 50 हून अधिक संपत्तीची यादी तयार केली असून त्यावर कारवाई सुरु आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यूएईत दार्‍यावर गेले होते. यावेळी भारत आणि यूएईमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात दाऊदच्या संपत्तीवरही चर्चा झाली होती. यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोभाळ यांनी दाऊदच्या मालमत्तेची लिस्टच यूएई सरकारला सुपूर्त केली होती. त्यानुसारच ही कारवाई सुरू केल्याचं समजतंय.  दाऊदला जेरबंद करण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close