फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार्‍या नेपाळी महिलेची नेपाळमध्ये रवानगी

December 31, 2009 12:06 PM0 commentsViews: 4

31 डिसेंबर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून नितु सिंग नावाच्या एका नेपाळी महिलेला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरुन काढून टाकण्यात आलं आहे. नेपाळमधले राजकीय नेते अमरिश कुमार सिंग यांची ती पत्नी आहे. गेल्या 3 वर्षापासून ती पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये शिकत होती. मात्र संशयावरून तिला काढण्यात आलं आहे. तिला नेपाळला परत पाठवण्यात आलंय. गेल्या 5 डिसेंबरला पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

close