व्हॉट्सअॅपच्या वादातून तरुणांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

September 8, 2015 10:35 AM0 commentsViews:

KALYAN FIGHT

08 सप्टेंबर : कल्याणमधील अग्रवाल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटात व्हॉट्स ऍप ग्रुपवरुन झालेल्या हाणामाराती एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या हाणामारीत पाच जण जखमी झाले असून पडघा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

व्हॉट्स ऍपवर सुजीत डोळे उर्फ देवा ग्रुप आणि गोंधळी ग्रुप यामधल्या विद्यार्थांमध्ये गेल्या एक आठवड्यापासून वाद सुरु होता. त्यातून परस्परांच्या ग्रुपमधील मुलींची छेड काढण्याचे प्रकार सुरु झाल्याने वाद विकोपाला गेला होता. गोंधळी ग्रुपमधील 100 ते 125 तरुण देवा ग्रुपच्या सुजीत डोळेला मारण्यासाठी त्याच्या गावीही गेले होते. मात्र सुजीत घरी नसल्याने ते माघारी परतत होते. ही बाब सुजीतला समजताच त्याने गोंधळी ग्रुपला रस्त्यातच गाठलं. एवढंच नाही तर बाईकवरील तरुणांना फॉर्च्यूनर गाडीनेही उडवलं. यात विनय विश्वकर्मा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर 5 तरुण जखणी झाले. जखमींवर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close