औरंगाबाद- नगर रोडवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

September 8, 2015 11:06 AM0 commentsViews:

ÖêêËÖêÖêß

08 सप्टेंबर : औरंगाबादमध्ये स्विफ्ट आणि तवेरा गाडीत झालेल्या धडकेत 7 प्रवाशांचा दुदैर्वी मृत्यू झाला. मृतांमधे तीन पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री उशीरा औरंगाबाद-नगर रोडवर स्विफ्ट गाडीचा टायर फुटल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि समोरुन येणार्‍या तवेराला धडक दिली.

या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये गंगापूर पोलीस ठाण्याचे अशोक थोरात, भगवान दुधे आणि मेहबूब सय्यद या तीन पोलिसांचा समावेश आहे. तर तवेरातून प्रवास करत असलेल्या दौलताबाद इथल्या फळ विक्रेत्याचाही यात मृत्यू झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close