राकेश मारियांची ‘तडकाफडकी’ बढती, अहमद जावेद नवे आयुक्त

September 8, 2015 2:54 PM0 commentsViews:

Rakesh-Maria

08 सप्टेंबर : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची,तडकाफडकी होमगार्डच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी होमगार्डचे पोलीस संचालक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजच आपला पदभार स्विकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राकेश मारिया शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करत होते. गुन्ह्यांची कसून तपास करणारे आणि थेट रस्त्यावर उतरुन पोलीस दलाचे मनोबल वाढवणारे अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 30 सप्टेंबरला राकेश मारियांचा कार्यकाळ संपणार होता. त्यानंतरच मारियांना बढती मिळणे अपेक्षीत होते. बढती मिळण्यापूर्वी शीना बोरा हत्याप्रकरणातले महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी मारिया आणि त्यांची टीम दिवस रात्र मेहनत घेत होती. मात्र मारिया यांना 20 दिवसांपूर्वीच बढती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, सणांच्या काळात बदल होणं योग्य नसल्यामुळे मारियांची 20 दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली असून यामागे काहीच राजकारण नसल्याचं राज्याचे गृहसचिव के. पी. बक्षी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close