‘कारगिल’थांबवण्यासाठी वाजपेयींच्या सांगण्यावरून दिलीपकुमारांचा शरीफ यांना फोन !

September 8, 2015 4:11 PM0 commentsViews:

atal bihari and deelipkumar08 सप्टेंबर : कारगिल युद्धाच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना फोन केला होता अशी बाब आता उजेडात आलीये. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचं बोलणं करून दिलं होतं, असा दावा पाकिस्तानाचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय. ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्ह’ या कसुरींच्या पुस्तकात हा दावा करण्यात आलाय.

1999 च्या कारगिल युद्धाच्या दरम्यान पंतप्रधान वाजपेयींनी नवाज शरीफ यांना फोन करून आपली तीव्र नाराजी कळवली.
त्यावर बोलताना आपल्याला काहीही माहित नसल्याचं शरीफ यांनी सांगितलं. लष्कर प्रमुखांशी बोलून कळवतो असंही शरीफ म्हणाले. त्यानंतर वाजपेयींनी फोन दिलीप कुमार यांच्याकडे दिला. दिलीपकुमार यांचा आवाज ऐकून शरीफही आश्चर्यचकीत झाले. “मीयाँ साहेब, तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होणं चांगलं नाही. तुम्हीच दोन्ही देशांमध्ये शांती असावी असं म्हटला होता. त्यामुळे तुम्ही हे प्रकार बंद करायला पाहिजे” असं दिलीपकुमार यांनी शरीफ यांना सुनावलं असा दावाही कसुरी यांनी या पुस्तकात केलाय. दिलीपकुमार पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानामध्ये तणाव निर्माण होतो. भारतातील मुस्लीम स्वता:ला असुरक्षीत मानतात. एवढंच नाहीतर घरातून बाहेर पडण्यासाठी घाबरतात. त्यामुळे तुम्ही हे थांबवा असं आवाहनही दिलीपकुमार यांनी केलं होतं. विशेष म्हणजे, दिलीप कुमारपेशावरचे रहिवाशी आहे. त्यांचं खरं नाव युसूफ खान आहे. पाकिस्तान सरकारने सर्वोच्च असा ‘निशान-ए-इम्तियाज’ पुरस्कार देऊन दिलीपकुमार यांचा गौरव केला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close