जॅकेट गहाळ प्रकरणी 8 पोलिसांना नोटीस

January 1, 2010 8:48 AM0 commentsViews: 2

1 जानेवारी शहीद हेमंत करकरेंच्या गहाळ जॅकेट फाईल प्रकरणी 8 पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एका आयपीएस अधिकार्‍यालाही महानगर दंडाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. 26/11ला मुंबईवर हल्ला झाला त्या दिवशी हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या अंगावर असलेले जॅकेट गहाळ झाल्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी माहितीच्या अधिकारा वापर करुन जॅकेटची माहिती मागितली होती. त्यानंतर हे जॅकेट गहाळ झाल्याचं प्रकरण उघड झालं होतं.

close