पवारांवर टीका म्हणजे उसने आणलेलं अवसान, धनंजय मुंडेंचा पलटवार

September 8, 2015 5:45 PM0 commentsViews:

d munde on vikhe patil08 सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांनी दौरा करून शेतकर्‍यांना काहीही दिलं नाही. मुख्यमंत्र्याच्या दौर्‍यामुळे शेतकर्‍यांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याचा आरो़प विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. तर बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केलीय. विखे पाटलांची शरद पवारांवरील टीका उसने आणलेले अवसान आहे. पवारांवर टीका करण्यापेक्षा स्वता:चा तालुका सोडून दुष्काळाची पाहणी करावी असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी विखे पाटलांना दिलाय.

धनंजय मुंढे आज परभणीत होते. त्यांनी तालुक्यातील असोला शिवारातील दुष्काळी शेतीची पाहणी केली आणि शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्र्यावर चौफेर टीका केली. “मुख्यमंत्र्यांनी दौरा केला पण त्याचा उपयोग काही झाला नाही. शेतकर्‍यांना काहीही दिले नाही आणि एवढी भीषण परिस्थिती असताना अद्यापही कालच्या बैठकीत त्यांनी दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलीय हे निषेधार्थ असून त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या या मुख्यमंत्र्यांमुळे होताहेत” असा टोला लगावत बाळासाहेब विखे पाटील यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. पवार साहेब 75 वर्षांचे असूनही राज्यभर दुष्काळ पाहत आहेत. शासनाला विनंती करत आहे. विखे पाटील यांनी कधीही आपल्या तालुक्याबाहेर पाऊल टाकला नाही आणि पवारांवरील टीका म्हणजे त्यांनी उसने आणलेले अवसान असल्याचे म्हंटले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close