शीना बोरा प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही -अहमद जावेद

September 8, 2015 6:27 PM0 commentsViews:

ahmad javed08 सप्टेंबर : राकेश मारिया यांच्या बदलीमुळे शीना बोरा प्रकरणाच्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. तपास ज्या दिशेनं सुरू होता तो तसाच सुरू राहणार आहे असं नवनियुक्त पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी स्पष्ट केलं.

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आलीये. अहमद जावेद यांनी आज (मंगळवारी) मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारली. राकेश मारिया यांना डीजी होमगार्ड्स पदी बढती देण्यात आली.

पदभार स्वीकारल्यानंतर अहमद जावेद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अहमद जावेद यांनी शीना बोरा प्रकरणी तपासात कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्ट केलं. एखाद्या केसवर आम्ही टीम मिळून काम करतो. घटनेची संपूर्ण तपास त्याचा पूर्व माहिती आणि दिशा काय असले यानुसारच तपास केला जातो. अशा केसवर तपास करण्यासाठी सक्षम अशी टीम आहे त्यामुळे कोणताही अडथळा येणार नाही अशी ग्वाही अहमद जावेद यांनी दिली. तसंच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात येईल. या सुरक्षेत वाढ कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल असंही त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close