शीना बोरा हत्येप्रकरणाचा तपास राकेश मारियाच करणार !

September 8, 2015 9:41 PM0 commentsViews:

rakesh maria_shenna bora case08 सप्टेंबर : राकेश मारिया यांची तडकाफडकी बढती करण्यात आली आहे. शीना बोरा हत्याप्रकरणामुळे राकेश मारियांची बदली करण्यात आली असा संशय व्यक्त केला जाता होता पण, आता शीना बोरा खून प्रकरणाची चौकशी राकेश मारियाच करणार आहेत असं अतिरिक्त मुख्य गृहसचिव के पी बक्षी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या वादावर आता पडदा पडलाय.

चार्जशीट दाखल होईपर्यंत आणि सगळे सत्य समोर येई पर्यंत शीना बोरा खून प्रकरणाची चौकशी राकेश मारीयाच करणार आहेत अशी माहिती के.पी.बक्षी यांनी दिलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close