मित्राची गंमत जिवावर बेतली, पार्श्वभागी एअर पाईप लावल्यानं तरुणाचं मोठं आतडं फाटलं

September 8, 2015 9:52 PM0 commentsViews:

08 सप्टेंबर : पुण्यातील कोंढवा परिसरातील साई सर्व्हिस सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार घडला. गाडी धुत असलेल्या फारुख दुर्गा या मुलाच्या पार्श्वभागात त्याच्या सहकार्‍याने गंमत म्हणून एअर पाईप लावला ही गंमत मात्र फारुखच्या जीवावर बेतलीये. कारण, यात त्याच मोठं आतडं फाटलं. सध्या कमल क्रिटिकल केअर सेंटरमध्ये अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत

pune kondhavaसर्वांचे उदास चेहरे …आई हवालदिल ..20 वर्षांच पोरं मरनाशी झुंज देतंय,त्याच्या अवस्थेने तीच ह्रदय कातरलं जातंय. एका गंमतीने त्याची ही अवस्था केलीय. डॉक्टर संचेती यांनी वेळीच सर्जरी करून त्याला वाचवलं. पण 3 लाखांहुन अधिक आलेला खर्च भरायच कुठून हा प्रश्न फारुखच्या कुटुंबासमोर आहे.

फारुख गाडीच्या चाकावर उभा राहून गाडीच टप पुसत होता.तेव्हा आरोपी सुरेश ओरान याने त्याच्या पार्श्वभागात एअर पाईप धरला.अन फारुख बेशुद्ध झाला.कोंढवा पोलिसांनी आरोपीला पळून जाताना पकडलंय,त्याला सध्या पोलीस कोठडी दिली गेलीय.

साई सर्व्हिस सेंटरने 50 हजारांची मदत केली. मात्र, इंथुन पुढे देऊ शकणार नाही म्हटलंय. फारुख एका कॉन्ट्रक्टरकडे असल्याचं म्हणून
संबंध नसल्याचं सांगत जबाबदारी झटकलीय. पोलिसांनी आरोपीवर कलम 308 म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. पण फारुख मात्र कायमचा अपंग झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close