मुंबईसह भारतभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत

January 1, 2010 9:58 AM0 commentsViews: 1

1 जानेवारी मुंबईसह देशभरात नवं वर्षाच स्वागत जल्लोशात करण्यात आलं. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांचं आवडीचं ठिकाण म्हणजे गेट वे ऑफ इंडिया. तिथे जमलेल्या मुंबईकरांनी आतिषबाजी करत नववर्षाचं स्वागत केलं. तर पुण्यातही टर्फ क्लब इथे वाईल्ड वाईल्ड वेस्ट या नववर्षाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रसिध्द गायक वॅलेन्टाईन शिपले, सुप्रसिध्द गायिका चित्रा अय्यर, इंडीयन आयडॉल फेम केशव यांनी मनोरंजन केलं. या पार्टीला पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. नागपूरमध्ये मात्र एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोलिसांनी नागरिकांना नववर्षाचा संदेश दिला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शांतीचा संदेश देणारी गुलाबाची फुलं पोलिसांनी वाटली. तसंच नियमांचं काटेकोर पालन करा आणि थर्टी फर्स्ट शांततेत साजरा करा असा संदेश पोलिसांनी यातून सर्वांना दिला.

close