ही आहेत जगातील 20 आलिशान हॉटेल्स !

September 8, 2015 10:41 PM0 commentsViews:

तुम्ही कधी मोठी हॉटेल्स पाहिली तर साहजिकच हे हॉटेल आतून कसं असणार हा सर्वसामान्य प्रश्न आपल्याला पडतो…जर बाहेरूनच भव्य असेल तर आतमध्ये काय मजा असेल हे नुसतं स्वप्नवतच…पण जगातील अशी काही 20 हॉटेल्स आहे ज्याचे फोटो जरी पाहिले तर त्यांची भव्यदिव्यात आपल्याला लक्षात येईल…पाहुया टॉप 20 आलिशान हॉटेल्सची झलक….

2. मंदारिन ओरिएंटल, हॉगकॉग,चीन : हॉगकॉग मधील मंदारिन ओरिएंटल हॉटेल हे 130 वर्षं जुनं हॉटेल आहे. मंदारिन ओरिएंटल हॉटेलमध्ये भरपूर आधुनिक सुविधा आहेत.

3. ट्रॅप इंटरनॅशनल हॉटेल एंड टॉवर,न्युयॉर्क,अमेरिका : ट्रॅप इंटरनॅशनल हॉटेल एंड टॉवर ला फिलिक जॉनसन आणि कोस्टल कोंडायलीने घडवलं म्हणजे डिजाईन केलं होतं. हे हॉटेल 52 मजली आहे.

4.लंघम हॉटेल , लंडन,इंग्लंड : लंघम हॉटेल हे पहिलं ग्रँड हॉटेल ओळखलं जातं. या हॉटेलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि हे हॉटेल 150 वर्ष जुनं आहे.

5.सोहो हाऊस,बर्लिन,जर्मनी : बर्लिनला 1928 ला दुसर्‍यांदा बनवलं. सोहो हाऊसमधील 40 खोल्या खूपच आकर्षितरित्या डिजाईन
केल्या आहेत. हे हॉटेल 8 मजली आहे. पण यामध्ये एक अजब गोष्ट अशी की, हॉटेलमध्ये फक्त हॉटेल्सच्या मेंबरना प्रवेश देण्यात येतो. बाहेरील जगासाठी हे हॉटेल बंदच आहे.

6.हॉटेल एमिगो,ब्रेसेल्स,बेल्जियम : बेल्जियम ची राजधानी ब्रेसेल्स मधील हे शानदार हॉटेल मानलं जातं.बेल्जियम चा श्वास असं ओळखलं जातं. या हॉटेल मध्ये 174 बेडरूम आहेत.

7.फोर सीजन रिसॉट ,हुलालेई, हवाई, अमेरिका : फोर सीजन रिसॉट हे जगातील सर्वात सुंदर हॉटेलपैकी एक आहे.हॉटेलमधुन समुद्रकाठाचे सुंदर दृश्य पाहायला मिळतं.

8.वेंटवर्थ वाडा, दक्षिण कॅरोलिना,अमेरिका : अमेरिकेमधील दक्षिण कॅरोलिनामध्ये वेंटवर्थ हा वाडा 18 व्या शतकात बांधला आहे.समुद्र दृश्ये आणि कडा प्रसिद्ध आहे.

9.ग्रेशम पॅलेश,बुदापेस्ट, हंगेरी ; हंगेरीमधील बुदापेस्ट हा ग्रेशम पॅलेस चा एक विलक्षण भाग आहे.जे मध्य युरोपमध्ये अभिजात आहे. ग्रेशम पॅलेस हे 19 व्या शतकात बांधले गेले आहे.

10.क्रिलन हॉटेल,पॅरिस,फ्रान्स :फ्रान्समधील राजा लुईने हा वाडा बांधला आहे. सन 2012 मध्ये या वाड्याचे भरपूर बदल
घडविण्यात आले. या हॉटेलमधील मजेदार गोष्ट म्हणजे हायस्पीड इंटरनेट चा आस्वाद हा विनामुल्य मिळतो.

11.लि सायरेन्युग,पॅसिटॅनो,इटली : इटलीमधील 18 व्या शतकात या हॉटेलची उभारणी करण्यात आली. या हॉटेलमधील संग्रहालयात महान कलाकृती आहे.

12.रिट्झ कार्लटन शांघाय,पुदोन्ग,चीन : चीनमधील हे सर्वात आरामदायी हॉटेल आहे. हे 58 मजली आहे. सन 1930 मध्ये हे हॉटेल
बांधलं गेलंय. जगातील सर्वात आरामदायी हॉटेलपैकी एक हॉटेल आहे.

13.पेंसिनसुला हॉटेल,टोकियो,जपान : पेंसिनसुला हॉटेल जपानी संस्कृतीच एक ज्वलंत उदाहरण आहे. या हॉटेलची लॉबी 2 मजली आहे त्यामध्ये 1300 दिव्याची रोशनाई करण्यात आलीये.

14.अमांदरी बाली : बालीमधील अमांदरी हॉटेल हे सुट्टी घालवण्यासाठी विलक्षण हॉटेल आहे. हे हॉटेल गावाच्या स्वरूपात डिझाईन केलं आहे. आयुर्वेदिक मसाजसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.

15.विला सॅन मिशेले,फ्लोरेन्स : इटलीमधील विला सॅन हे हॉटेल 15 व्या शतकात बांधल गेलंय. युरोपमधील सर्वात सुंदर हॉटेलपैकी एक आहे.

16.द डोल्डर ग्रँड, ज्युरिख,स्वित्झर्लंड :ज्युरिख च्या खोर्‍यामध्ये वसलेल हे डोल्डर ग्रँड स्वित्झर्लंड मधील हे सर्वात अप्रतिम हॉटेल आहे.

17.वेन्सियन रिसॉट आणि कसीनो,लास वेगस,अमेरिका : 1 लाख 20 हजार लांबीचं कसीनो ज्या हॉटेलमध्ये असेल ते काही साधारण हॉटेल नाही. या हॉटेलमध्ये मनोरंजन पार्क,शॉपिंग सेंटर आणि 80 जागतिक दर्जाचे बुटीक आहे. आणि मॅडम तुसाद वॅक्स म्युझियमही आहे.

18.चेल्सिया हॉटेल,सोहो,न्युयॉर्क,अमेरिका : ऐतिहासिक चेल्सिया हॉटेल हे अमेरिकेची शान आहे. हे हॉटेल 100 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. या हॉटेलमध्ये अनेक हॉलीवूडचे चिञपट चिञित करण्यात आले आहेत.

19.ताज लेक पॅलेस,उदयपूर,राजस्थान,भारत : या यादीत भारताच एकमेव हॉटेल ताज लेक पॅलेस हे आहे.18 व्या शतकात हे हॉटेल बांधलं गेलं आहे.

20.बुर्ज अल अरब,दुबई,युएई : दुबई बुर्ज अल अरब हे जगातील सर्वात आरामदायी हॉटेल्सपैकी एक आहे. तसंच जगातील सर्वात उंच हॉटेल आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close