रुचिका प्रकरण : डीआयजी रोठोडला अंतरिम जामीन मंजूर

January 1, 2010 10:01 AM0 commentsViews: 3

1 जानोवारी रुचिका आत्महत्या प्रकरणी निवृत्त डीआयजी राठोडला 7 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. पंचकुला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. रुचिकाचं शोषण केल्याप्रकरणी निवृत्त डीआयजी राठोडला 6 महिन्यांची शिक्षा झाली होती. या निर्णयाविरोधात सीबीआयने अपील केलं होतं. राठोडला सेक्शन 354 नुसार 2 वर्षांची शिक्षा व्हावी, अशी मागणी सीबीआयने कोर्टात केली आहे. तसंच रुचिकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306अंतर्गत राठोडवर गुन्हा नोंदवावा यासाठीही सीबीआय केंद्र सरकारचा सल्ला घेणार आहे. रुचिका आत्महत्या प्रकरणी सीबीआयदेखील राठोडची शिक्षा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

close