विद्या बालनची मराठी सिनेमात एंट्री, साकारणार गीता बाली !

September 8, 2015 11:20 PM0 commentsViews:

08 सप्टेंबर : ‘ऊलाला’ गर्ल विद्या बालन आता मराठी सिनेसृष्टी एंट्री घेणार आहे. किमया फिल्म्स निर्मित आणि शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘एक अलबेला’ या सिनेमातून अभिनेत्री विद्या बालन ही पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करताना दिसणार आहे. viday balan

भगवान दादांच्या आयुष्यावर बनत असलेल्या या सिनेमात भगवान दादांची व्यक्तिरेखा अभिनेता मंगेश देसाई साकारणार आहे तर विद्या ही अभिनेत्री गीता बालीच्या छोट्याशा भूमिकेत दिसणार असल्याचं समजतंय.

सिनेमाच्या टीमने या भूमिकेसाठी विद्याची भेटही घेतलीय. आणि विद्याने या सिनेमात गेस्ट अपिअरन्स द्यायला होकारही दिलाय. या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरूवात झालीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close