राकेश मारियांची बदली की ‘बदला’?

September 8, 2015 11:42 PM0 commentsViews:

08 सप्टेंबर : राकेश मारियांचा आजचा दिवस मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून शेवटचा दिवस असेल असा विचारही कुणी केला नव्हता…इतकचं काय स्वत: मारियांनाही सकाळपर्यंत कल्पना नव्हती की त्यांना प्रमोशन मिळणार आहे. आणि अचानक आज तडकाफडकी…त्यांना बढती देण्यात आली डीजीपी होमगार्ड्सपदी, आणि त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली अहमद जावेद यांची, अहमद जावेद यांना डावलून राकेश मारियांना संधी देण्यात आली होती. आणि आता मारियांच्या जागी पुन्हा अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली. आणि हे एवढ वेगानं घडलं की आजच्या आजच अहमद जावेद यांनी पदभारही स्वीकारला.

rakesh maria_newsराकेश मारिया यांच्या बढती मागे, शीना बोरा खूनप्रकरणाचा तपास असल्याची चर्चा आहे. दिल्ली आणि गुजरात कनेक्शनमधून मारियांना हटवण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

शीना बोरा प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनाही तपासारुन हटवण्यात आलंय. पण शीना बोरा प्रकरण आणि मारियांच्या बढतीचा संबंध नसल्याचा दावा अहमद जावेद यांनी केलाय.

राकेश मारिया एक धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. याकूब मेमनच्या अंत्यसंस्काराच्यावेळी, त्यांनी जातीनं हजर राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं.आणि आता हाय प्रोफाईल, शीना बोरा प्रकरणात तर ते स्वत: खार पोलीस स्टेशनमध्ये थांबून तपास करत होते. पण आता तोचं तपास त्यांना भोवला का? इतक्या तडाकाफडकी त्यांना बढती का दिली? आता मिळालेली बढती म्हणजे मारियांना बाजूला टाकणं नव्हे का? असे प्रश्न आता विचारले जातायत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close