केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांची वाढ

September 9, 2015 1:13 PM2 commentsViews:

5398318403a71.image

09 सप्टेंबर : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, 1 जुलै 2015पासून हा भत्ता लागू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तसंच हा भत्ता 1 जानेवारी 2015पासून लागू करण्यात आला होता. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना मूळ पगारात 113 टक्के महागाई भत्ता मिळत होता. त्यात आणखी सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    Maharashtra Govt. F.M still not sanctioned 6% D.A. w.e.f. 1st January 2015 and another 6% D.A. w.e.f. 1st July 2015. Employees,and pensioners are egarly waiting from Maharashtra Govt to take the decision immediately.

  • Sohan Chawre

    Why not sanction of state Employee 6 % DA ? So late !

close