मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही – उद्धव ठाकरे

September 9, 2015 3:26 PM0 commentsViews:

uddhav_on_ncp

09 सप्टेंबर : मांसविक्रीवर बंदी घालण्याचा प्रश्नच येत नाही. यावर सर्वांना आपली भूमिका मांडली आहे. मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकारांना सांगितलं.

भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषणाच्या काळात आठ दिवस, तर मुंबई महानगरपालिकेने चार दिवस मांसविक्रीवर बंदी घातली आहे. नवी मुंबई महापालिकेनेही मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मांसविक्री बंदीला शिवसेनेने पहिल्यापासूनच विरोध केला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मांसविक्रीवर बंदी घालू देणार नसल्याचे म्हटलं आहे.

जैन धमच्यांच्या पवित्र पर्युषण काळात मांसविक्रीवरील बंदीचे भाजपकडून समर्थन केलं जात आहे. मीरा-भाईंदरमध्ये दीड लाखांच्या आसपास जैन लोकसंख्या असल्यानेच मांसविक्रीवरील बंदीचा निर्णय घेतल्याचा दावा महापौर गीता जैन यांनी केला.

दरम्यान, या निर्णयाला काँग्रेस, शिवसेना, मनसे, समाजवादी पक्ष या पक्षांनी या बंदीस जोरदार विरोध दर्शविला आहे. आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार काल रात्री शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नगरसेवकांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यावर एकमत झालं आहे. येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना महापालिका सभागृहात मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या महापौर गीता जैन यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपची सत्तेला धोका निर्माण झालां आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close