औरंगाबादमध्ये पारध्यांची घर जाळली

January 1, 2010 10:10 AM0 commentsViews: 2

1 जानेवारीगावात कापूस चोरी होत असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कडेठाण येथील गावकर्‍यांनी पारध्यांच्या शेतात जनावरं घुसवून त्यांच्या झोपड्या पेटवून देण्याची घटना घडली आहे. जग नव्या वर्षाचं स्वागत करीत असताना इथल्या पारध्यांना उघड्यावर रहावं लागतंय. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अत्याचाराविरोधात पारध्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पाचोड पोलीस ठाण्यात ऍट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पारधी कुटुंबीयांनी सध्या एका शेजारच्या गावात आसरा घेतलाय.

close