बिहारमध्ये दिवाळीपुर्वीच ‘फटाके’ फुटणार; 12 ते 5 नोव्हेंबर 5 टप्प्यात मतदान

September 9, 2015 5:28 PM0 commentsViews:

7856voting_mumbai_new09 सप्टेंबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहारच्या निवडणुकीच्या बिगुल अखेर वाजलंय. बिहारमध्ये पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 12 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान एकूण पाच टप्प्यात मतदान होईल. आणि 8 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन दिवाळीपूर्वीचं नव सरकार येईल. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. आजपासूनच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झालीये.

बिहारमध्ये एकूण 243 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर
16 ऑक्टोबरला दुसर्‍या टप्प्यात, 28 ऑक्टोबर तिसरा टप्पा, 1 नोव्हेंबर चौथा आणि 5 नोव्हेंबरला 5 व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 8 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. तसंच मागील निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या नावांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे यावेळी ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचा फोटो असणार आहे.

बिहार विधानसभा निवडणूक

पहिला टप्पा : 12 ऑक्टोबर
दुसरा टप्पा : 16 ऑक्टोबर
तिसरा टप्पा : 28 ऑक्टोबर
चौथा टप्पा : 1 नोव्हेंबर
पाचवा टप्पा : 5 नोव्हेंबर
निकाल : 8 नोव्हेंबरला

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close