सीमेवरचे पाणीसाठे दूषित करण्याचा पाकचा विषारी डाव

September 9, 2015 6:10 PM0 commentsViews:

rajstan loc09 सप्टेंबर : सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय. त्यातच आता पाकिस्ताननं भारताच्या कुरापती काढण्याचा नवा डाव रचलाय. राजस्थानच्या सीमेवर असलेले पाणीसाठे दूषित करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. गुप्तचर विभागाने ही माहिती दिलीये.

राजस्थानजवळच्या भारत-पाकिस्तान सीमेवरच्या जलस्रोतांमध्ये विषारी पदार्थ मिसळवण्याचा डाव पाकिस्तान रचत असल्याची
गुप्तचार विभागाची माहिती आहे. या माहितीनंतर जैसलमेर आणि बाडमेर जिल्हा प्रशासनाने जलस्रोतांची सुरक्षा वाढवलीय. या दोन
जिल्ह्यांमधल्या पाणीसाठ्यातून गावकर्‍यांबरोबरच लष्करालाही पाणीपुरवठा केला जातोय. दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्सच्या वरिष्ठ अदिकार्‍यांनी आज दिल्ली बैठक आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close