धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

September 9, 2015 7:27 PM0 commentsViews:

Dhananajay on fafjh09 सप्टेंबर : विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. जगमित्र शुगर्स या त्यांच्या नियोजित खाजगी साखर कारखान्याच्या जमीन प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

2012 मध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जगमित्र शुगर्ससाठी पूस शिवारात मुंजाजी किसान गीते या एका शेतकर्‍याची 3 हेक्टर 12 गुंठे जमीन विकत घेतली होती.

यासाठी ठरलेल्या व्यवहार पैकी 40 लाख रुपयांचा धनादेश हा 2015 पर्यंत न वाटल्यानं या शेतकर्‍याने 8 सप्टेंबरला बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह इतर दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आलाय.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात 420/34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही धनंजय मुंडेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रकृती ठिक नसल्याचं सांगण्यात आलं.एकूणच धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यान त्यांच्या समोरील अडचणी ह्या वाढल्या आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close