देवस्थानं देणार का दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात ?, IBN लोकमतचं आवाहन

September 9, 2015 7:30 PM0 commentsViews:

09 सप्टेंबर : महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय. मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती बिकट झाली असून माणस तर दूरच जनावरांनीही पाण्यापासून वचिंत राहावं लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. भगवानगडाप्रमाणे इतरही देवस्थान ट्रस्ट दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेणार का ? असं आवाहन आयबीएन लोकमतनं केलंय.

drouth help4तीर्थक्षेत्र भगवानगडानं दुष्काळी तीन गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. भगवानगडाप्रमाणेच इतरही देवस्थान ट्रस्टने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावं यासाठी आयबीएन लोकमतने इतरही देवस्थानशी संपर्क साधला असता पंढरपूरचं देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी कधीही तयार असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष, आणि सोलापूरचे कलेक्टर तुकाराम मुंडे यांनी सांगितलं.

त्याप्रमाणे पुण्यातील श्रीमंत दगडशेठच्या ट्रस्टनेही दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. म्हणूनच शिर्डी साईबाबा आणि सिद्धीविनायक सारखी श्रीमंत देवस्थानं दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी नेमकी कधी पुढे येणार हेच पाहायचं आहे.

तसंच अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याप्रमाणेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही दुष्काळग्रस्तांना मदत करणार का हेच पाहायचं आहे ?

आयबीएन लोकमतचं आवाहन

भगवान गड देवस्थानने 3 गावं घेतली दत्तक
– पंढरपूर देवस्थाननेही मदतीची दाखवली तयारी
– दगडूशेठ ट्रस्टने सुरू केली दुष्काळग्रस्तांना मदत
-साईबाबा शिर्डी संस्थान दुष्काळग्रस्त गावं कधी दत्तक घेणार ?
-सिद्धी विनायक ट्रस्ट दुष्काळग्रस्तांना कधी मदत करणार?
-नाना-मकरंदप्रमाणेच सचिन तेंडुलकरही दुष्काळग्रस्तांना मदत करणार का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close