अमरावतीत 9 दिवस मांस विक्रीवर बंदी, बंदी मोडल्यास फौजदारी कारवाई

September 9, 2015 10:09 PM0 commentsViews:

amravati meatban09 सप्टेंबर : मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसांच्या मांसविक्रीवर बंदीचा प्रश्न मार्गी लागला असला असला तरी अमरावतीमध्ये 9 दिवसांची बंदी जाहीर करण्यात आलीये. महत्वाचं म्हणजे या दिवसांमध्ये मांसविक्री करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय.

जैन धर्मीयांच्या पर्युषणपर्व असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेनं आजपासूनचं मटनाच्या दुकानावर कारवाई करण्यास सुरुवात केलीये. अनेक दुकानातील मांस जप्त करण्यात आलं असून कत्तलीचं साहित्यही जप्त केलंय. श्रावण महिना सुरू झाल्यानं मटनविक्रीत घट आहे. त्यातच ही बंदी त्यामुळे मटनविक्रेते त्रस्त झालेत. जैन धर्मियांचे पर्युषण काळामध्ये नेहमीचं 2 दिवस मासविक्री बंद ठेवतो मात्र 9 दिवसांच्या बंदीमुळे आमच्यावर अन्याय होतं असल्याचं मटनविक्रेत्याचं म्हणणंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close