चिमुरड्या आयलानला श्रद्धांजली

September 9, 2015 10:52 PM0 commentsViews:

समुद्रकिनार्‍यावर वाहत आलेला आयलन कुर्दीच्या मृतदेहाचा फोटो, व्हिडिओ जगभरात पोचला आणि स्थलांतरितांचा प्रश्न किती दाहक बनत चाललाय हे जगासमोर आलं. याच आयलन कुर्दीला श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचा मृतदेह जिथे आढळला त्या समुद्रकिनार्‍यावर फुलं वाहिली जातायत. या समुद्रात नित्यानं येत असलेले समुद्रस्वार मात्र धास्तावलेत. यापेक्षाही वाईट परिस्थिती आम्हाला बघावी लागू शकते या विचारानं त्यांना त्रासलंय. आयलन, त्याचा भाऊ गॅलिप आणि आई रेहान यांचा ग्रीसकडे जाणारी बोट उलटून मृत्यू झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

 

close