शिर्डी संस्थानाला महागाईचा फटका

January 1, 2010 12:14 PM0 commentsViews: 94

1 जानेवारी शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने 1 जानेवारीपासून जेवणाचा दर 10 रुपये केला आहे. कारण जेवणाच्या एका ताटासाठी संस्थानाला 17 रुपये खर्च करावा लागतोय. साईभक्तांना अत्यल्प दरात म्हणजेच 6 रुपयात जेवण देत होतं. वाढत्या महागाईचा फटका आता शिर्डीतल्या साईबाबांच्या प्रसादालाही बसला आहे. त्यामुळे दर वाढवावा लागल्याचं संस्थानाचं म्हणणं आहे. पण संस्थानाला देणगीच्या माध्यमातून वर्षाला 200 ते 250 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे जेवणाचे दर वाढवण्याची गरज नव्हती असं साईभक्तांचं म्हणणं आहे.

close