अजितदादांची टगेगिरी सुरूच

September 9, 2015 10:56 PM1 commentViews:

09 सप्टेंबर : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला होता. तरीही अजितदादांची खुमखुमी काही गेलेली दिसत नाही. म्हणूनच अजितदादांनी माळेगावच्या संचालक मंडळाला डीसीसी बँकेचा प्रतिनिधी कारखान्याच्या डायरेक्टरपदी नियुक्त करण्यासाठी जाहीरपणे दमबाजी सुरू केलीय. “मी, सांगितलेला प्रतिनिधी नेमला तरच कारखान्याला डीसीसी बँकेमार्फत कर्ज मिळेल, अन्यथा कर्ज रोखून धरू”, असा जाहीर दमच अजितदादांनी माळेगावच्या संचालक मंडळाला भरलाय. दादांच्या टगेगिरीविरोधात कारखान्याचे अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

 

  • Swanand Deshpande

    Wah! Kay Adarsha Rajkaran!!!!!

close