रेडी रेनकरच्या प्रॉपर्टी दरात 18 टक्के वाढ

January 1, 2010 12:18 PM0 commentsViews: 10

1 जानेवारी राज्यात रेडी रेकनरच्या प्रॉपर्टी दरात सरासरी 18 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्टॅम्प ड्युटीमध्येही वाढ होणार आहे. सरकारतर्फे दरवर्षी प्रॉपर्टीचं मूल्यांकन केलं जातं. त्या मूल्यांकनाच्या पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. मात्र यावर्षी करण्यात आलेल्या मुल्यांकनात 18 टक्के वाढ झाल्याने स्टॅम्पड्युटीही वाढणार आहे. त्यामुळे सामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न मात्र महागलंय. या वाढी मुळे मुंबईत अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दरात 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर 1 जानेवारीपासून लागू झालेत.

close