केडीएमसीतून 27 गावं वगळता येणार नाही- निवडणूक आयोग

September 10, 2015 9:25 AM0 commentsViews:

135431-kdmc

10 सप्टेंबर : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर 27 गाव वगळ्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या राजकारणाला आपसूकच चपराक बसली आहे.

कल्याण- डोंबिवली महापालिकेत 27 गावांना समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णया राज्य सरकारने सोमवारी बदलला आहे. या 27 गावांना केडीएमसीच्या हद्दीतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

केडीएमसीतून वगळ्यात आलेल्या 27 गावांमध्ये शिवसेनेचं प्राबल्य असल्याने, भाजपने ऐन निवडणुकींच्या तोंडावर महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या गावांमध्ये मनपा निवडणूक होणार की नाही याबाबत साशंकता होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुका होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतून 27 गावं वगळता येणार नसल्याचं सांगितलं आहे. आयोगाने राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा मनसेनं स्वागत केलं आहे. आयोगाने या 27 गावांना मनपा हद्दीत कायम ठेऊन एकप्रकारे युतीमधल्या कुरघोडीच्या राजकारणालाच मोठी चपराक दिलीये, असं मत मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केलं आहे. युती सरकारने लोकांना गृहीत धरलं होतं. याचा आम्ही निषेध करतो, असंही सरदेसाईंनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close