विधू विनोद चोप्रांनी मागितली पत्रकारांची माफी

January 2, 2010 9:19 AM0 commentsViews: 2

2 जानेवारी थ्री इडियटसचे प्रोड्युसर विधू विनोद चोप्रा यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत लेखक चेतन भगत यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता विधु विनोद चोप्रा भडकले होते. पत्रकार परिषदेत विधू विनोद चोप्रा यांनी पत्रकारांना शटअप म्हटलं होतं. यावेळी त्यांनी आपला राग पत्रकारांवर काढला. पण त्यानंतर चोप्रा यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे. 'मी शुक्रवारी मुर्खपणा केली. मी उत्तेजीत झालो होतो. मी असं बोलायला नको होतं.' अशा शब्दात चोप्रा यांनी माफी मागितली आहे. तसंच 3 इडीयट रिलीज होण्याअगोदरच चेतनला पैसै दिल्याचं त्यांनी सांगितलं.

close