उत्तरप्रदेशमध्ये ट्रेनचे 3 ठिकाणी अपघात : 6 जण ठार तर 50 जखमी

January 2, 2010 9:22 AM0 commentsViews: 1

2 जानेवारी उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झालेत. उत्तर प्रदेशातल्या इटावा जवळ लिछवी एक्स्प्रेस आणि मगध एक्स्प्रेसची टक्कर झाली. तर कानपूरजवळही अशाच प्रकारचा अपघात झाला आहे. कानपूर मध्ये झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाल आहेत. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतं. या तीनही अपघाताची चौकशी करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. रेल्वे अपघातात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख, तर गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची मदत रेल्वेने जाहीर केली आहे.

close