FTII च्या विद्यार्थ्यांचं आता ‘उपोषणास्त्र’

September 10, 2015 4:35 PM0 commentsViews:

ftii fast strick10 सप्टेंबर : गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधी फिल्म अँड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा लढा अजून सुरूच आहे. आज एफटीआयआयच्या 3 विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरूवात केलीये.

हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणंय. आजपर्यंत शांततेनं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर आम्हाला उपोषणाचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती रद्द करण्याची हालचाल केंद्र सरकारने सुरू केलीये. प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिराणी यांना संचालकपदासाठी विचारणा करण्यात आली मात्र, त्यांनी याला नकार दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close