सकाळच्या अजानसाठी लाऊड स्पीकर वापरणार नाही, नवी मुंबईतील मशिदींचा निर्णय

September 10, 2015 6:05 PM0 commentsViews:

masjid azan10 सप्टेंबर : सकाळच्या अजाणसाठी लाऊड स्पीकर न वापरण्याचा निर्णय, नवी मुंबईतल्या 54 आणि पनवेल परिसरातल्या 120 मशिदींनी घेतलाय.रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊड स्पीकर वापरायला, सर्वोच्च न्यायालयानं बंदी केली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं पालन करण्याचा, निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतलाय.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय यानुसार रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वापरण्यास बंदी आहे. या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील मुस्लिम बांधवाच्या कमिटीने स्वागत करीत त्यावेळेत लाऊड स्पीकरचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सकाळची 6 वाजता पूर्वीची अजाण बंद होणार आहे. नवी मुंबईत 54 तर पनवेल परिसरात 120 मस्जीद आहेत. तसंच या परिसरातल्या अनधिकृत मस्जिदींवरचे लाऊडस्पिकरही काढूण टाकण्यात आलेत. त्यामुळे धार्मिक स्थळाच्या न्यायालयांच्या या निर्णयाचे पालन करून मुस्लिम बांधवांनी नवी मुंबईतील सामाजिक एकोपा आणि धार्मिक सहिष्णुता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close