संस्थाचालकाच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू

January 2, 2010 10:00 AM0 commentsViews: 2

2 जानेवारी संस्थाचालकांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे सोलापूरमधल्या होटगी इथल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. उस्मानिया उर्दू हायस्कूलचे शिक्षक मोहम्मद हनीफ तांबोळी यांना शाळेच्या बांधकामावर पाणी मारले नाही म्हणून संस्थाचालकाचा नातेवाईक शोएब हमीद याने मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान तांबोळी यांचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी आता शोएब हमीदवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close