जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण

September 10, 2015 6:53 PM1 commentViews:

statute of Bharat Ratna Dr.Babasahab Ambedkar at Koyasan University Japan.10 सप्टेंबर : जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. कोयासान विद्यापीठाच्या परिसरात हा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आलाय.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामा प्रांताचे राज्यपाल शिनाबु निकासा, रिपाइंचे नेते रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या भागात प्राचीन कोयासान टेम्पल आहे, त्याला 1200 वर्ष पूर्ण झालेत. महाराष्ट्र पर्यटन खात्याने हा पुतळा उभारला आहे. महत्वाच म्हणजे ब्रॉन्जचा हा पुतळा रत्नागिरीच्या कुडाळमध्ये तयार करण्यात आलाय.

यावेळी कोयासान विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात एक करार झाला असून, या कराराद्वारे कोयासान विद्यापीठात पाली, संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल तर वाकायमा प्रांत आपलं एक कार्यालय औरंगाबादमध्ये स्थापन करणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Indian Politician

    जपान मध्ये कोण आहे बाबासाहेब आंबेडकर बद्दल कौतुक आणि अभिमानान सांगणारे? बुद्धीचा आणि पैशाचा अप्व्याय आहे.सगळ्यांनी हातात पांढरे मोजे का बरे घातले अश्पृश्य्ता जोपासायला ?

close