मांस विक्रेत्यांना मनसे संरक्षण देणार -राज ठाकरे

September 10, 2015 7:35 PM0 commentsViews:

raj thackaey pc10 सप्टेंबर : महाराष्ट्रात काय करायचे आणि काय करायचे नाही हे जैनांनी नाही ठरवायचं. हा महाराष्ट्र आहे गुजरात नव्हे असं ठणकावून सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. हे मतांच्या राजकारणासाठी सुरू असून जैन विरूद्ध हिंदू असा रंग याला देण्यात आलाय. उद्या आमच्यावर यांनी संघर्षाची वेळ आणू नये, संघर्ष झाला तर एकतर्फी होईल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.मांसविक्रेत्यांनी खुशाल मांस विक्री करावी मनसे त्यांना संरक्षण देईल अशी घोषणाच राज यांनी यावेळी केली.

मीरा-भाईंदर महापालिकेत जैन पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला. यापाठोपाठ मुंबई पालिका, नवी मुंबई आणि अमरावती पालिकेतही बंदीचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या धोरणामुळे मनसे, शिवसेनेनं कडाडून विरोध केला. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात काय करायचे आणि काय करायचे नाही हे जैनांनी नाही ठरवायचं. आज हे मांसबंदी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. उद्या दुसर्‍या कुठल्या गोष्टीत घुसतील. जैन धर्मीया फायदा भाजप करून घेत असून हे सर्व भाजपनेच पेरलंय. उद्या प्रत्येक जण हेच म्हणेल. उद्या मुस्लीमही म्हणतील रमजानच्या महिन्यात हॉटेल बंद ठेवा. श्रावणात मांस बंदी का केली नाही, गणपतीला का मांस बंदी नाही ?, मुळात जैन धर्मीयांना होकार दिला कुणीच ?,याची सुरुवात शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेत केली. कशाला हवी आहे मांसविक्रीवर बंदी ? कुठचाही दिवस पाळायची गरज नाही. रोज मांसविक्री झालीच पाहिजे असं राज यांनी ठणकावून सांगितलं.

तसंच कुठच्या धर्मासाठी काही करायची गरज नाही. हा रंग खरं तर जैन विरूद्ध हिंदू असा येतोय.भाजप मतांच्या राजकारणासाठी सगळा खटाटोप करत आहे. राज्यात आणि देशात मोगलाई आहे का ? असा सवाल उपस्थित करत आमच्यावर यांनी संघर्षाची वेळ आणू नये, संघर्ष झाला तर एकतर्फी होईल असा इशाराच राज यांनी दिला. नाशिक महापालिकेत मांस बंदी होऊ देणार नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं.

राज्यात आज किती टोलबंद झाले आणि अवैध टोलवर काय कारवाई झाली असा सवाल उपस्थित करत आयआरबी कंपनी ही राजकीय पक्षांना फंड पुरवणारी कंपनी आहे असा गंभीर आरोप राज यांनी केला. तसंच भाजप हा भारतीय जंतपक्ष आहे असा टोलाही त्यांनी लगावला. राकेश मारियांची बदली नको हवी होती असंही राज म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close