मुख्यमंत्र्यांच्या घोषणेविषयी निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

January 2, 2010 10:01 AM0 commentsViews: 2

2 जानेवारी अशोक चव्हाण यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करणार्‍या गावांना विशेष मदतीची घोषणा केली होती. ही घोषणा मुख्यमंत्र्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या घोषणेची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देवाशीष चक्रवती यांनी दिले आहेत. अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. ज्या गावांनी अशोक चव्हाण यांना जास्त मतदान केलं, अशा गावांना 5 लाख रुपये विशेष निधी देण्याची घोषणा चव्हाण यांनी केली होती. या घोषणेनंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

close